Final Certificate Final Certificate

Ganpati Permission Certificate

PMC_logo

पनवेल महानगरपालिका, पनवेल

ता. पनवेल, जिल्हा - रायगड , पनवेल - ४१०२०६.

PMC_logo

दूरध्वनी कार्यालय : ०२२-२७४५८०४०,४१,४२

उपायुक्त कार्यालय : ०२२-२७४५५७५१

ईमेल: panvelcorporation@gmail.com

फॅक्स नं.: ०२२-२७४५२२३३

आयुक्त कार्यालय : ०२२- २७४५२३३९

वेबसाईट :www.panvelcorporation.com


जा.क्र. /पमपा/ परवाना/ {{ $form->application_unique_number }} /2024

दिनांक : {{ now()->format('d/m/Y') }}

 
प्रति,  
            
{{ $form->application_address }}

            ता. पनवेल, जि. रायगड
 
विषय : सार्वजनिक गणेश उत्सव 2024 मंडप करीता परवानगी मिळण्याबाबत.

                        संदर्भ :  १) मंडप महानगरपालिका अधिनियम

                            २) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५.
                            ३) आपला दिनांक {{ Carbon\Carbon::parse($form->created_at) }} रोजीचा अर्ज.
                            ४) मा. पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस स्टेशन वाहतुक शाखा, यांचेकडील नाहरकत दाखला
 
           उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरुन, अर्जदार यांना पनवेल महानगरपालिका हद्दीतील {{ $form->application_address }} ता. पनवेल, जि. रायगड या ठिकाणी दि. {{ $form->pandal_start_date }} ते दि. {{ $form->pandal_end_date }} रोजी सार्वजनिक गणेश उत्सव 2024 करीता मंडप उभारणेकामी खालील अटी / शर्ती नुसार परवानगी देणेत येत आहे.

१) सदर परवानगीची मुदत दिनांक {{ $form->pandal_start_date }} ते {{ $form->pandal_end_date }} पर्यंत देणेत येत आहे.

२) मा. उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका क्र.१७३/ २०१० मधिल आदेश राबवणे निर्देशानुसार मार्गदर्शक तत्त्वे, अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी अन्यथा संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई करणेत येईल.

३) दि. {{ $form->pandal_start_date }} - दि. {{ $form->pandal_end_date }} रोजीचे परिपत्रकामधील उत्सवाचेवेळी रस्त्यावर उभारण्यात येणारे तात्पुरते स्वरुपाचे मंडप/ स्टेज/ कमानी यासंबंधीचे पारीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

४) वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन यांची परवानगी घेतल्यानंतरच मंडप घालावा.

५) वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतुक, यांची परवानगी घेण्याची जबाबदारी आपणावर राहील.

६) आवश्यक असणाऱ्या शासनाच्या इतर विभागाकडील परवानग्या घेण्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.

७) ध्वनीक्षेपक लावणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी पोलिस विभागाची परवानगी स्वतंत्रपणे घ्यावी.

८) मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक १८/०७/२००५ चे निकालात दिलेल्या निर्देशानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सह ध्वनीप्रदुषण नियमन व नियंत्रण नियमावली, २००० चे कलम १५ व कलम १९ अन्वये ध्वनीक्षेपक यंत्रणांच्या वापराची वेळ मर्यादा सकाळी ०६.०० वा ते रात्रौ १०.०० वाजे पर्यंत राहील.

९) सदर ठिकाणी रहदारीस अडथळा होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.

१०) परवानगीची मुदत समाप्त होताच मनपा रस्त्यावर व गटारांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा / घाण / टाकावु पदार्थ इ. मुळे अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी व याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.

११) सार्वजनिक जागेत आयोजित केल्या जाणाऱ्या ठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कचरा कुंड्या ठेवल्या जातील याची दक्षता आयोजकांनी घेण्यात यावी. सभोवतालच्या १०० मीटर पर्यंतच्या परिसरात स्वछता राहील याचीही काळजी घ्यावी.

१२) शेजारच्या इमारतीची हवा, प्रकाश व इमारतीचे प्रवेशद्वार बंद होईल अशाप्रकारे मंडप बांधू नये, मंडपाच्या बाबुंचा स्पर्श शेजारच्या इमारतींना होता कामा नये तसेच रस्त्यावर सामान टाकू नये.

१३) मंडपात कोठेही विटांचे बांधकाम किंवा चौथरा उभारु नये. तसेच जमा झालेला कचरा त्वरेने तेथून हलवावा व मंडप स्वच्छ ठेवावा.

१४) मंडपात आगप्रतिबंधक साहित्य पुरेशा प्रमाणात असावे, तसेच मंडपात ज्वालाग्राही वस्तुंचा साठा नसावा. परवानगीधारकाने अग्निशमन प्रतिबंधक सर्व उपाययोजना कराव्यात.

१५) कार्यक्रमाचे ठिकाणी फटाके किंवा स्फोटक पदार्थ वाजवू नये, अथवा साठा करून नये.

१६) परवानगी दिलेल्या ठिकाणी कोणत्याही जिवीत अथवा वित्तहानी यासाठी परवानगी धारक जबाबदार राहील तसेच महानगरपालिका याबाबत कोणतीही भरपाई देणार नाही.

१७) स्थानिक प्राधिकरण/शासणकडील वेळोवेळी पारित होणारे निर्देश/शासन निर्णय / परिपत्रके याबाबतचे काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित आहे.

१८) महानगरपालिकेच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करु नये.

१९) कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित झाल्यास महानगरपालिकेचा निर्णय अंतिम राहील.

२०) परवानगीच्या ठिकाणी कोणतेही जाहिरात फलक, कापडी फलक व झेंडे, बॅनर्स इत्यादी विनापरवानगी प्रदर्शित करण्यात येवू नयेत, अन्यथा जाहिरात नियम व मालमत्ता विरुपण कायदा १९९५, मा. उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये परवाना धारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

२१) सदर मंडपात कोणत्याही जातीय / धार्मिक भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बॅनर, देखावे किंबा फलक नसावेत.

२२) मुदत संपल्यानंतर सदरचे कमान / मंडप स्टेज तात्काळ काढून टाकण्यात यावे.

२३) सार्वजनिक कार्यक्रमाच्या बाबतीत देण्यात आलेली ना हरकत परवानगी कोणत्याही क्षणी प्रचलित कायदे व दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन झाल्यास सदर ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार सर्वस्वी महानगरपालिकेचे राहील.

२४) सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मंडपामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात यावे.

२५) आपणास दिलेली परवानगी कोणत्याही क्षणी रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त यांना आहेत.

उपरोक्त परवानगी मध्ये अटी व शतींचा भंग झाल्यास दिलेली परवानगी रद्द समजण्यात येईल.

 
PMC_Sign

(गणेश शेटे)



उपायुक्त

पनवेल महानगरपालिका

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीकरीता :-

१) मा.वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल.

२) मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल

३) मा. तहसिलदार सो. पनवेल.

४) वाहतुक पोलीस निरीक्षक, पनवेल

५) शहर अभियंता,आपल्या अधिनस्त अधिका-यांकडून देणेंत आलेल्या परवानगीचे वेळोवेळी पहाणी करून अहवाल सादर करावा.

६) संबंधित क्षेत्रिय अधिकारी ,पनवेल महानगरपालिका

७) अग्निशमन विभाग, पनवेल महानगरपालिका