आम्ही मंडप व आसपासच्या परिसर नमूद केलेल्या कालावधीत तसेचउत्सव पूर्ण झाल्यावर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी घेतो. तसेच उत्सव पूर्ण झाल्यावर २४ तासाच्या आत मंडप काढून टाकणे आणि परिसर आणि रस्त्याची साफसफाई करणे मंडळाचीजबाबदारी स्वीकारीत आहोत.मंडप उभारणीमुळे सार्वजनिक सुविधांची हानी झाल्यास,पनवेल महानगरपालिकेस मंडळाला सोसायटीला दंड आकारण्याचा / करण्याचा अधिकार राहील याची मला जाणीव आहे . पनवेल महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय फेरीवाले, इतर खाद्यपदार्थ, रिफ्रेशमेंट यांचेस्टॉल उभारले जाणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.मंडळामार्फत कोणत्याही प्रकारची फी नागरिकांकडून आकारली जाणार नाही .मंडप उभारताना / उभारल्यानंतर नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही याची संपूर्ण जबाबदारी मंडळाची असेल.प्रवेशद्वार गेटमध्ये कोणतेही प्रतिबंधित केलेले लेख आणि प्रतिबंधित केलेल्या उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित होणार नाहीत या बाबत आम्ही दक्षता घेऊ. त्याचप्रमाणे पादचारी मार्ग वाहनांची वाहतूक आणि आसपासच्या परिसरात कोणताही अडथळा नसणार याची काळजी मंडळातर्फे घेण्यात येईल , हे आम्ही मान्य करतो. मूर्तीचे विसर्जन मंडपातील कृत्रिम तलावात अथवा पनवेल महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रामध्येच किंवा विसर्जन घाटात करणार याचे आम्ही पालन करू शासनाच्या नियमाप्रमाणे व पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे व कोरोनाच्या शासनाच्या नियमावली नुसार सर्व नियमांचे पालन मंडळामार्फत करण्यात येईल व तसे न झाल्यास संपूर्ण जबाबदारी मंडळाची असेल याची आम्हाला जाणीव आहे कोणत्याही सूचनांचे अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास legal & penal च्या कार्यवाहीसाठी मी (मंडळ) पात्र असेन